दोन ट्रेनची टक्कर, स्पेनमध्ये भीषण अपघातात 64 जण मृत्यूमुखी

व्हीडिओ कॅप्शन, Verticle दोन ट्रेनची टक्कर, स्पेनमध्ये भीषण अपघातात 64 जण मृत्यूमुखी
दोन ट्रेनची टक्कर, स्पेनमध्ये भीषण अपघातात 64 जण मृत्यूमुखी
Published

या अपघातात आत्तापर्यंत किमान 64 जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राजधानी माद्रिदच्या दक्षिणेला हा अपघात झाला असून 500 हून अधिक प्रवासी या दोन ट्रेनमधून प्रवास करत होते.

या अपघातात अनेक डबे रुळावरून घसरले. काही डबे उंच रेल्वेमार्गावरून खाली कोसळले. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून रुग्णवाहिका आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात येत आहे. रेल्वे ऑपरेटर अडिफच्या माहितीनुसार या अपघातात सरकारी कंपनी रेन्फे आणि खासगी कंपनी इर्योच्या ट्रेनचा समावेश आहे.

2013 नंतरचा हा देशातील सर्वाधिक जीवितहानी झालेला रेल्वे अपघात ठरला आहे. अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)