मेडिकलमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात आले 10 हजार कोटी
10 हजार रुपये पगारांची नोकरी करणाऱ्या एका व्यक्तीच्या बँक खात्यात 10 हजार कोटी रुपये जमा झाले. ही घटना घडलीय राजस्थानच्या सीकर येथे.
समीर खान हे एका मेडिकल स्टोअरमध्ये महिना 10 हजार रुपये पगारावर नोकरी करतात. बुधवारी सकाळी त्यांच्या बँक खात्यात 55 हजार रुपये होते. दुपारी त्यांना मोबाईल रिचार्ज करायचा होता, त्यासाठी त्यांनी बँकेच्या ॲपवरून पेमेंट करण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रान्झॅक्शन झालं नाही.
जेव्हा त्यांनी ॲपमध्ये ट्रान्झॅक्शन हिस्टरी पाहिली, तेव्हा 10 हजार कोटी रुपये खात्यात क्रेडिट झाल्याचा मेसेज दिसला, यानंतर समीर स्वतःचे पैसेही वापरू शकत नव्हते कारण त्यांचं खातं फ्रिझ झाले होते, त्यामुळे ते आपल्या दुकान मालकासोबत सायबर पोलिसांत गेले, जिथून त्यांना बँकेशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले.
बँकेशी संपर्क साधल्यानंतर त्यांचे खाते पूर्ववत झाले. आता ते आपले खाते वापरू शकत आहेत आणि 10 हजार कोटी रुपयांचा मेसेजही हटवण्यात आला आहे.
बँक मॅनेजर नितेश कुमार यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, 'समीर यांच्या खात्यात कोटींच्या घरात रक्कम क्रेडिट झाल्याचा मेसेज होता. ही एक टेक्निकल एरर होती जे बॅंकेकडून झालं नव्हतं. आता समीर यांचं खातं फ्रिझवरून काढण्यात आलंय.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



