अमरावतीत अनेक मुलींचे शेकडो व्हीडिओ बनवणारे ते चार जण कोण?

अमरावतीत अनेक मुलींचे शेकडो व्हीडिओ बनवणारे ते चार जण कोण?

नाशिकनंतर आता अमरावतीतून अनेक मुलींच्या लैंगिक शोषणाचं प्रकरण उघडकीस आलं आहे. अमरावतीच्या परतवाडा शहरात अनेक मुलींचं लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हीडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. बीबीसी मराठीने आरोपींची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या वतीने अद्याप बोलण्यास कुणीही उपलब्ध होऊ शकलेलं नाही.

पीडितांच्या कुटुंबीयांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी, त्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असं आवाहन अमरावती ग्रामीण पोलीसांनी केलं आहे.

रिपोर्ट - नितेश राऊत, बीबीसी मराठीसाठी

व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - अरविंद पारेकर

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन