BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
टेस्लाची उडणारी कार खरंच प्रत्यक्षात वापरता येईल का? इलॉन मस्क यांनी दिलं 'असं' उत्तर
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये टेस्लाच्या 'रोडस्टर' या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कारची एक नवीन आवृत्ती सादर करण्यात आली. या कारला खऱ्या अर्थानं उडणारी कार असल्याचं म्हटलं जात आहे.
'कालपासून खूप तणावात होतो, आता दिलासा मिळाला'; अभिजीत दिपके यांच्या आईची प्रतिक्रिया
आयसा अध्यक्ष नेहा बोरा आणि सीजेपी संस्थापक अभिजीत दिपके यांना 16 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यानंतर नेहा बोरा यांची सुटका करण्यात आली. तर अभिजीत दिपकेंविरोधात बीएनएसएस कलम 126/170 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
भारत सोडण्याच्या नोटिसविरोधात इमरान खानने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली याचिका
अभिनेता आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इमरान खाननं त्याला बजावलेल्या नोटीस प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे.
मुस्लीम महिलेच्या निधनानंतर हिंदूंनी पुढे ढकलली रामलीला; उत्तर प्रदेशातील गावाची अनोखी गोष्ट
हिंदू-मुस्लीम एकतेचा आणि सलोख्याचा हा प्रसंग संपूर्ण परिसरात चांगलाच चर्चेत आला असून सोशल मीडियावरही लोक या निर्णयाची विशेष चर्चा करत आहेत.
साडी, दागिने, डोळ्यांत काजळ; अहमदाबादेत पुरुषांनी चनिया चोळी परिधान करून गरबा खेळण्यामागची गोष्ट
महिलांचा वेश घेऊन नटलेले हे पुरुष सादुमाता चौकातील मंदिरासमोर गरबा खेळण्यासाठी एकत्र येतात. त्यांच्या श्रद्धेनुसार, हा गरबा केवळ आनंदासाठी किंवा मनोरंजनासाठी नसतो, तर देवीची माफी मागण्याचा एक भाग असतो.
मृत पिल्लाला वाहून नेणाऱ्या हत्तीणीची हृदयद्रावक गोष्ट; फोटोग्राफरने पाठलाग केला अन् 'हे' समजलं
सध्या 14 वर्षांच्या असलेल्या या हत्तीणीचे स्वतःचे पिल्लू दोन वर्षांपूर्वी दगावले होते. तेव्हापासून तिने इतर हत्तीणींच्या मृत जन्माला आलेल्या पिल्लांना सोबत वाहून नेल्याच्या अशा तब्बल 4 वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत, असे विंटर सांगतात.
स्मिता पाटील : 'तिचे वडील मंत्री होते, पण तिच्या वागण्या-बोलण्यात साधेपणा होता'
अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या आज (17 ऑक्टोबर) जन्मदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
जेलर 2 : 'रजनीकांत' नावाचा ब्रँड 50 वर्षांनंतरही कायम राहण्याची गोष्ट
रजनीकांत यांनी 1980 आणि 1990 च्या दशकात अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये साइड हिरो किंवा इतर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये काम केलेलं होतं. यामध्ये विशेषतः अशा चित्रपटांचा समावेश होता, ज्यांमध्ये अमिताभ बच्चन हिरो होते. मग हा ब्रँड कसा तयार झाला? जाणून घ्या
रक्तातील साखर थोडी वाढली तरी घाबरत असाल तर, तज्ज्ञ याबाबत काय सांगतात ते जाणून घ्या
निरोगी व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी वाढणं ही एक सामान्य बाब आहे. पण आजकाल रक्तातील साखर वाढल्यानंतर चिंता व्यक्त करणं हा 'ट्रेंड' बनला आहे.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, ध्रुव राठी यांची विशेष मुलाखत : सीजेपी, पोलिसांची कारवाई ते नागरिकत्व, वेळ 16,05
युट्यूबर ध्रुव राठी सध्या भारतात आहे. बंगळुरूमधील एका कार्यक्रमात तो 'कॉकरोच जनता पार्टी'च्या नेत्यांसोबत उभा असलेला दिसला. मात्र, 10 ऑक्टोबरला ज्या दिवशी जंतर मंतरवर CJP चं आंदोलन होतं त्या दिवशी पोलिसांनी ध्रुवला गुरुग्राममधील त्याच्या घरातून ताब्यात घेतलं.
व्हीडिओ, दिल्लीत कलम 163, अनेक मेट्रो स्टेशन बंद; राहुल गांधींचा सुप्रीम कोर्टाकडे मोर्चा, वेळ 3,30
बाराखंबा जंक्शनवरून राहुल गांधी दुपारी सुप्रीम कोर्टाच्या दिशेने मोर्चा नेणार असल्याने जंतर मंतरकडे जाणाऱ्या मार्गांवर काय घडतंय? पाहूयात.
व्हीडिओ, अभिजीत दिपकेंना आजीच्या निधनाची बातमी पोलिसांनी कधी सांगितली? आरोप - प्रत्यारोप, वेळ 4,54
10 ऑक्टोबरच्या दिवशी CJP ने आंदोलनाचा इशारा दिला होता. याच दिवशी अभिजीत दिपकेंच्या आजीचं निधन झालं. ही बातमी पोलिसांच्या ताब्यात असताना दिपकेंना कशी दिली गेली याबद्दल CJP ने पत्रकार परिषदेत आरोप केले.
व्हीडिओ, आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जंतरमंतरकडे जाणाऱ्या दिल्लीच्या कनॉट प्लेस परिसरात 'अशी' होती परिस्थिती, वेळ 3,38
कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जंतर मंतरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर काय परिस्थिती होती? आंदोलकांचा सहभाग कसा होता? पोलिसांनी काय कारवाई केली? या भागातील रहदारी कशी होती? याचा आढावा घेतला बीबीसीचे प्रतिनिधी निलेश धोत्रे यांनी.
व्हीडिओ, 'ते घरात घुसले, मला फरफटत नेलं आणि किडनॅप केलं'; ध्रुव राठीनं सांगितला घटनाक्रम, वेळ 1,42
यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ध्रुव राठीला पोलिसांनी 10 ऑक्टोबर 2026 ला सकाळी गुरुग्राममधून ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर आता ध्रुव राठीने आपली भूमिका मांडली आहे. जाणून घ्या तो काय म्हणाला
व्हीडिओ, आंदोलकांचा संसद भवनाकडे जाण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून धरपकड, वेळ 1,10
आज (11 ऑक्टोबर) दुपारी 2 वाजता सीजेपी प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी दिल्लीतील प्रेस क्लब ऑफ इंडिया येथे पत्रकार परिषद घेतली. यानंतर काय घडलं याचा बीबीसीचे प्रतिनिधी निलेश धोत्रे यांनी घेतलेला हा आढावा.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रातून काय सांगितलं?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
अफगाणिस्तानातल्या पुरातन गार्देझ गणपतीची गोष्ट, कसा होता काबूलचा 'महाविनायक'?
काबूलच्या उत्तरेला दहा मैलांवर सकर धर (शंकर धर) इथे ही दुसरी मूर्ती सापडली होती आणि ती काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती. ती चौथ्या शतकाच्या मध्यातली असावी असा अंदाज ढवळीकरांनी व्यक्त केला आहे.
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.


































































