BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
नेपाळमध्ये पुन्हा पुराचा इशारा, तिबेटच्या बाजूला असलेला तलाव फुटला
तिबेटच्या बाजूला ढिगाऱ्याच्या नैसर्गिक बंधाऱ्यामुळे तयार झालेला तलाव फुटल्याची माहिती नेपाळ पोलिसांनी दिली.
'गिझरला शॉक बसतो, इमारतीच्या परिसरात घुशी-उंदीर'; आदिवासी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलची स्थिती कशी आहे?
पुण्याजवळच्या मांजरी येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात अपुऱ्या सुविधा, बेड-कपाटांचा अभाव आणि महागाईच्या तुलनेत अपुरा डीबीटी भत्ता यामुळे विद्यार्थी उपोषणावर बसले आहेत.
'मुलगी मिळत नाही', पण प्रश्न फक्त मुलींचा आहे का? जळगावमधल्या 29 आत्महत्यांच्या आकडेवारीपलीकडची गोष्ट
जळगाव जिल्ह्यात 1 जानेवारी ते 30 जून 2026 या 6 महिन्यांत 383 पुरुषांनी आत्महत्या केल्याची आणि 29 पुरुषांच्या आत्महत्यांमध्ये लग्न न जुळणं हा एक कारणीभूत घटक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नेपाळ पूर : मृतांचा आकडा 469; आतापर्यंत काय काय माहिती आली समोर?
नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 389 वर पोहोचला आहे. नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी सांगितलं आहे की, बचाव पथकांनी आतापर्यंत जवळपास 600 जणांची सुखरूप सुटका केली आहे.
हिंदू धर्मासाठी नेपाळ इतकं खास का आहे? जाणून घ्या 'देवभूमी'बद्दल सर्वकाही
भगवान शंकराचं निवासस्थान मानल्या जाणाऱ्या या देशात पशुपतीनाथ मंदिर, मुक्तिनाथ आणि जनकपूरसारखी पवित्र स्थळं आहेत. कैलास-मानसरोवर यात्रेचा एक महत्त्वाचा मार्गही नेपाळमधून जात असल्याने दरवर्षी हजारो भाविक इथे येतात. पण नेपाळचं हिंदू धर्मातील महत्त्व नेमकं काय आहे आणि काशीशी त्याची तुलना का केली जाते?
हिमनदी एका झटक्यात कोसळली आणि नेपाळमध्ये पूर आला? शास्त्रज्ञांनी सांगितलं कारण
हिमनदीचा भाग कोसळल्यामुळे नेपाळ-तिबेटमध्ये भीषण पूर आला असावा असं प्राथमिक तपासात दिसून आलंय, यामुळे हिमालयातील वेगानं वितळणाऱ्या बर्फाचा प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला आहे, असं शास्त्रज्ञांनी बीबीसीला सांगितलं.
व्हीडिओ, प्रचंड पुरानंतर नेपाळच्या रुग्णालयातील परिस्थिती कशी आहे? - पाहा व्हीडिओ , वेळ 2,43
पूर आणि भूस्खलनातून वाचलेल्या लोकांना इथे आणलं जातंय, अनेकजण नातेवाईकांविषयी काही समजतंय का याची वाट पाहतायत. आपले प्रियजन सुरक्षित आहेत का, असा प्रश्न विचारतायत.
नेपाळमध्ये पुराचं रौद्ररूप; अर्धा पूल वाहून गेला, ड्रोनमधून दिसली भीषण दृश्यं
ड्रोनमधून घेतलेल्या या दृश्यात त्रिशूली नदीला आलेल्या भीषण पुरामुळे नदीकाठच्या भागात झालेला मोठा विध्वंस दिसत आहे. पुरामुळे येथील घरं आणि इतर पायाभूत सुविधांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे.
इस्रायल आणि तुर्कीयेमध्ये संघर्षाची शक्यता? दोघांमध्ये कुणाची लष्करी ताकद जास्त?
18 ऑगस्टला सीरियाच्या अबू अल-दुहूर हवाई तळावर इस्रायलने हल्ला केला. त्यानंतर इस्रायल आणि तुर्कीयेने एकमेकांना थेट इशारे दिले. त्यामुळे आता एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे- सीरियामध्ये तुर्की आणि इस्रायल संघर्षाच्या जवळ पोहोचले आहेत का?
Live, लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, अनाया बांगर : 'हरमनप्रीत, स्मृतीविरुद्ध खेळायला आवडेल'; क्रिकेट ॲास्ट्रेलियाने दिली परवानगी, वेळ 5,18
मुंबईची माजी अंडर-19 क्रिकेटर अनाया बांगरला आता ॲास्ट्रेलियात क्रिकेट खेळण्याची संधी मिळणार आहे.
व्हीडिओ, '12 मुलांमध्ये एकच टॉयलेट, आम्हालाच स्वच्छ करावं लागतं,' आदिवासी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलची स्थिती, वेळ 5,45
महाराष्ट्रातील आदिवासी वसतिगृह व आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्कांसाठी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यातील मांजरी येथे आंदोलन सुरू आहे.
व्हीडिओ, कर्ज वसुलीबाबत रिकव्हरी एजंटसाठी RBI चे नवे नियम जाणून घ्या, वेळ 4,01
कर्जवसुलीसाठीचे नवे नियम रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहेत. तुम्ही कर्ज घेतले असाल किंवा घेणार असाल, तर ग्राहक म्हणून तुम्हाला ते माहिती असायला हवेत.
व्हीडिओ, दीड एकरात वर्षाला 10 लाखांची कमाई; धाराशिवच्या वैशालीताईंची यशोगाथा, वेळ 5,36
नववीत असतानाच वैशालीताईंचं लग्न झालं. पुण्यात वाढलेल्या या मुलीला लग्नानंतर धाराशिव जिल्ह्यातील गावात जाऊन राहावं लागलं. शेतीचा त्यांना कोणताही अनुभव नव्हता.
व्हीडिओ, वय 92, अनुभव 68 वर्षांचा; तरीही या डॉक्टरांनी निवृत्तीला का नकार दिला आहे?, वेळ 4,37
एमबीबीएसची डिग्री पूर्ण केल्यापासून म्हणजे 68 वर्षांपासून डॉ. सुरी श्रीमथी प्रॅक्टिस करत आहेत.
व्हीडिओ, गोष्ट मॉडर्न रिलेशनशिपची : तुम्ही लग्नासाठी तयार आहात हे कसं ओळखायचं?, वेळ 46,18
लग्नाचं प्रेशर आलंय? मनात भरपूर प्रश्न आहेत? कोणाशी बोलावं कळत नाहीये? तुमचं टेन्शन कमी करायला आम्ही घेऊन आलोय नवी मालिका, 'गोष्ट मॉडर्न रिलेशनशिपची'
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.




































































