पूर, बेपत्ता नागरिक आणि मदतकार्य; पाहा नेपाळमधील भीषण पुराची छायाचित्रं

नेपाळच्या उत्तरेकडील रसुवा जिल्ह्यातील भोटेकोशी नदीत आलेल्या पुरानंतर विविध जिल्ह्यांमध्ये 18 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, नेपाळच्या उत्तरेकडील रसुवा जिल्ह्यातील भोटेकोशी नदीत आलेल्या पुरानंतर विविध जिल्ह्यांमध्ये 95 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

नेपाळच्या उत्तरेकडील रसुवा जिल्ह्यातील भोटेकोशी नदीला आलेल्या पुराने मोठं नुकसान केलं आहे. या आपत्तीत 95 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो पर्यटक आणि सुरक्षा दलातील कर्मचारी बेपत्ता आहेत. मदत आणि मदतकार्य सुरू असतानाच या संकटाचं भीषण रुप छायाचित्रांमधून स्पष्टपणे दिसून येतं.

पुरामुळे त्रिशूली नदीकाठचा परिसर चितवनपर्यंत धोक्यात येऊ शकतो, असं नेपाळ सरकारने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करत म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, पुरामुळे त्रिशूली नदीकाठचा परिसर चितवनपर्यंत धोक्यात येऊ शकतो, असं नेपाळ सरकारने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करत म्हटलं आहे.
291 परदेशी नागरिकांसह 384 पर्यटकांशी संपर्क होऊ शकलेला नाही, असं नेपाळ पर्यटन मंडळाने सांगितलं आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, 291 परदेशी नागरिकांसह 384 पर्यटकांशी संपर्क होऊ शकलेला नाही, असं नेपाळ पर्यटन मंडळानं सांगितलं आहे. यामध्ये 105 भारतीय पर्यटकांचाही समावेश आहे.
या आपत्तीत आतापर्यंत एकूण किती जण जखमी झाले आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, या संकटात आतापर्यंत एकूण किती जण जखमी झाले आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी देशाच्या प्रतिनिधी सभेला संबोधित केलं आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी देशाच्या प्रतिनिधी सभेला संबोधित केलं आहे.
परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं आहे की, रसुवा येथील आपत्तीजन्य परिस्थिती भूकंपासह झालेल्या हिमस्खलनामुळे निर्माण झाली होती आणि याबाबत पुढील पडताळणी केली जात आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, रसुवा येथील आपत्तीजन्य परिस्थिती भूकंपासह झालेल्या हिमस्खलनामुळे निर्माण झाली होती आणि याबाबत पुढील पडताळणी केली जात आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्र्यांनी दिलीय.
पूरानंतर नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, पूरानंतर नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.
परराष्ट्र मंत्री खनाल यांनी सांगितलं की, 26 पोलीस अधिकारी, 9 सशस्त्र पोलीस दलाचे जवान, 44 नेपाळी लष्कराचे जवान, सीमाशुल्क आणि स्थलांतर विभागातील कर्मचारी तसेच काही स्थानिक रहिवाशांशी संपर्क होऊ शकलेला नाही.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, परराष्ट्र मंत्री खनाल यांनी सांगितलं, 26 पोलीस अधिकारी, 9 सशस्त्र पोलीस दलाचे जवान, 44 नेपाळी लष्कराचे जवान, सीमाशुल्क आणि स्थलांतर विभागातील कर्मचारी तसेच काही स्थानिक रहिवाशांशी संपर्क होऊ शकलेला नाही.
पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत माहिती देताना लिहिलं, "पंतप्रधान बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा केली आणि नेपाळमधील पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल संवेदना व्यक्त केल्या. या कठीण काळात भारतातील जनता नेपाळमधील आपल्या भाऊ-बहिणींसोबत ठामपणे उभी आहे."

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत माहिती देताना लिहिलं, "पंतप्रधान बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा केली आणि नेपाळमधील पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल संवेदना व्यक्त केल्या. या कठीण समयी भारतातील जनता नेपाळमधील आपल्या भावाबहिणींसोबत ठामपणे उभी आहे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.