लोक त्याला विचारायचे, 'तू कुठला आहेस?' 27 वर्षांनी DNA चाचणीतून उलगडलं रहस्य

आई
    • Author, शो ली
    • Role, बीबीसी थ्री

इंग्लंडमधील मँचेस्टरच्या रॉचडेल या उपनगरात वाढलेला ल्यूक डेव्हिस नेहमी स्वत:ला वेगळा समजत असे.

तो सांगतो की, "जेव्हा मला समजलं की मी समलिंगी आहे तेव्हा मला वाटलं की हीच समस्या आहे."

वयाच्या 18 व्या वर्षी त्याने आपले पालक लिझ आणि गॅरी यांना त्याने आपल्या लैंगिकतेबद्दल सांगितलं. तो स्वतःलाही प्रश्न विचारू लागला.

वयाच्या 18 व्या वर्षी त्याचे पालक लिझ आणि गॅरी यांच्याकडे आल्यानंतर आणि पूर्वीपेक्षा त्याला वेगळं

एकदा एका मुलाखतीदरम्यान ल्यूकला एका मॅनेजरने सांगितलं की, तो यापूर्वी कामगार वर्ग, समलिंगी आणि मिश्र वंशाच्या लोकांना भेटला आहे.

ल्यूकचं संगोपन दोन श्वेतवर्णीय ब्रिटिश पालकांनी केलं. पण वेगळेपणामुळं तो गोंधळून जाऊ लागला.

शेवटी स्वतःचा शोध घेण्यासाठी डीएनए चाचणीचा मार्ग त्याने अवलंबला.

जानेवारी 2019 मध्ये जेव्हा ल्यूकची डीएनए चाचणी झाली, तेव्हा क्षणात त्याचं आयुष्य होत्याचं नव्हतं झालं.

त्यानंतरच्या तीन वर्षांत, त्याला स्वतःबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल जे काही माहीत होतं ते सगळ बदललं. आता त्याने बीबीसी थ्रीच्या 'स्ट्रेंजर इन माय लाइफ'मध्ये त्याने त्याच्या प्रवासाबद्दल सांगितलं.

निद्रानाश

एन्सेस्ट्री यूके येथील जेनेटिक जिओलॉजिस्ट लॉरा हाऊस सांगतात की, डीएनए चाचणी करणं आता खूप सोप्पं आहे. केस, तुमची लाळ यासारख्या गोष्टीतूनही डीएनए चाचणी केली जाते.

लॉरा सांगतात की, या डीएनए चाचणीतून दोन प्रकारच्या गोष्टींची माहिती समोर येते. एक म्हणजे आनुवंशिकतेबद्दल. समान डीएनए असलेल्या लोकसंख्येशी त्याची तुलना केली जाते. तसंच ते डेटाबेसमधील इतर लोकांच्या डीएनएच्या समानतेचं विश्लेषण करतात.

ल्यूक म्हणाला की त्यानं निकालाची वाट पाहत रात्र जागून काढली.

पण त्यानंतर होणाऱ्या बदलांसाठी तो तयार नव्हता.

आई

27 वर्षीय ल्यूक याला समजलं की, तो मिश्र वंशाचा आहे. डीएनए चाचणीत त्याचे खरे वडील आफ्रिकन- पोर्तुगीज वंशाचे असल्याचं समोर आलं.

म्हणजेच गॅरी, ज्यांना तो आतापर्यंत त्याचे वडील समजत होता, ते त्याचे खरे वडील नव्हते.

"डीएनए चाचणीचे निकाल आश्चर्यचकित करणारे होते," ल्यूक म्हणाला.

काही दिवसांनंतर, ल्यूक त्याची आई लिझशी या प्रकरणाबद्दल बोलला.

ते बोलणं आठवतानाही त्याला भरून येत होतं.

त्याला आईनं सांगितलं की, ती काही मित्रांसोबत पोर्तुगालला सुट्टीवर गेली होती. तिथे तिची बारटेंडर कार्लोससोबत भेट झाली.

त्या दोघांचे शारीरिक संबंध आले.

हे रहस्य तिनं 27 वर्षे लपवून ठेवलं होतं.

"हे कळल्यानंतर मला अनेक गोष्टींना सामोरे जावं लागलं. पण माझ्या मनात कुणाबद्दल राग नव्हता. आपल्या सर्वांमध्ये दोष आहेत. आपल्याला जे वाटतं ते सर्वांसोबत सांगण्याची आपल्याला संधी आहे," ल्यूकनं म्हटलं.

पण डीएनए चाचणीचे निष्कर्ष आले त्याचा ल्यूकवर मोठा परिणाम झाला. त्यानं नोकरी सोडली.

ल्यूकनं म्हटलं, "मला मानसिक आरोग्याच्या अनेक समस्या होत्या."

वंशभेदाचा अनुभव

डीएनए चाचणीच्या निष्कर्षामुळे ल्यूकला कळलं की त्याला इतरांपेक्षा वेगळं का वाटत होतं. त्यासोबतच काही नवे प्रश्नही उपस्थित झाले.

"मला प्रत्येक घटना, संभाषण आठवत आहे. माझ्यासोबत जे घडलं तो वर्णद्वेष होता, त्यामुळे नकळत मी दुखावलो गेलो," ल्यूक म्हणाला.

लहानपणी त्याला आठवतं, तो रॉचडेलचा असल्याचं त्यानं कोणाला सांगितलं तर ते विचारायचे, "नाही, तू नक्की कुठला आहेस?"

नवीन गोष्टींबद्दल काळजीत असताना ल्यूकला त्याच्या खऱ्या वडिलांना भेटायचं होतं. मात्र, त्यातही काही समस्या होत्या.

आपलं कुटुंब उद्ध्वस्त होईल अशी भीती त्याला वाटत होती.

आई
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्याच्या पालकांशी बोलल्यानंतर तो त्याचा खरा पिता कार्लोस यांना शोधण्यासाठी निघाला. त्यासाठी त्यानं लॉराची मदत मागितली.

लॉरासोबत त्यानं जवळपास 2.3 दशलक्ष डीएनए निष्कर्षांच्या ऑनलाइन डेटाबेसचे विश्लेषण करण्यास सुरुवात केली की जेणेकरून त्याचा डीएनए त्याच्या आजोबांशी किंवा जवळच्या नातेवाईकांशी जुळतो का हे पाहता येईल.

त्यातून सापडलेल्या माहितीच्या आधारे ल्यूक पोर्तुगालला गेला.

"ही खूप तणावाची परिस्थिती होती. हा भावनिक काळ आहे," तो म्हणाला.

ल्यूकने पोर्तुगीज वंशावळ तज्ज्ञ अँजेला कॅम्पोस यांची भेट घेतली. त्या लॉराच्या ओळखीच्या होत्या.

त्यांनी कार्लोसला शोध घ्यायला मदत केली.

कार्लोस जिथं काम करत होते त्या जुन्या बारमध्ये त्यांना त्याचे तपशील सापडले आणि त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना डीएनए चाचणी करण्यास सांगण्यात आलं.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते लंडनमध्ये राहत होते. त्यांनी आनंदानं डीएनए चाचणी करण्याचं मान्य केलं.

डीएनए चाचणीत स्पष्ट झालं की ल्यूकचे खरे वडील कार्लोस आहेत.

"त्यावेळी माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. ही एक गोड आठवण आहे," ल्यूक म्हणाला.

अनेक लोक मूळ कुटुंबाला शोधण्यास विलंब करतात

कार्लोस उत्साहानं ल्यूकला भेटला. त्याच्या दोन्ही मुलांशीही त्याची ओळख झाली. त्यांनी आपल्याला आनंदाने स्वीकारल्याचं ल्यूकला जाणवलं.

“कार्लोस आणि माझ्या भावांना भेटून खूप आनंद झाला,” ल्यूकने म्हटलं.

स्वत:ला पूर्णपणे समजून घेण्यासाठी त्याचं हे कुटुंब उपयोगी ठरलं.

त्याची आजी गिनी बिसाऊ येथील पेसिक्स बेटाची आहे. जेव्हा मी तिचा फोटो पहिल्यांदा पाहिला तेव्हा मी कृष्णवर्णीय लोकांशी जोडलो गेलो आणि तिच्यात आफ्रिकन जाणीव दिसली.

ल्यूकला आता काही वेगळं वाटत नाही.

आई

फोटो स्रोत, Nicholas Guttridge

तो म्हणाला, “माझी वेगळी मतं मला सर्वोत्कृष्ट बनवतात.”

आता ल्यूकचे त्याचे पालक आणि खरे वडील कार्लोस यांच्याशी चांगले संबंध आहेत.

"अनेक लोक त्यांच्या मूळ कुटुंबाला खूप उशीरा शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांची ओळख पटेपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला असतो," लॉरानं आपलं मत व्यक्त केलं.

"वीस वर्षांपूर्वी तुमचा खरा पिता कोण हे जाणून घेण्याची कोणतीही शक्यता नव्हती. काहीही करता येत नव्हतं. पण, डीएनए चाचणी अधिक व्यापकपणे केली गेली, तर ल्यूकसारख्या अनेकांना मदत होईल," असं लॉरा सांगतात.

लॉरा सांगतात की, दत्तक घेण्याच्या नोंदी उपलब्ध नसलेल्या देशांमध्ये डीएनए चाचण्यांचे निष्कर्ष जाणून घेणं शक्य आहे का, हे पाहावं लागेल.

"स्वतःचा कौटुंबिक इतिहास जाणून घेण्याची परवानगी मिळवणं यापेक्षा महत्त्वाचं काय आहे," त्या म्हणाल्या.

खऱ्या वडिलांचा शोध घेताना ल्यूकला स्वतःचाही शोध लागला.

"या तीन वर्षांच्या काळात मला अनेक भावनिक प्रसंगाचा सामना करावा लागला आहे, पण या प्रक्रियेनंतर मात्र हे जीवन मिळाल्याचा मला खूप आनंद आहे," ल्यूक म्हणतो.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)