You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'कोणत्याही देशाच्या राष्ट्राध्यक्षाला इतर देशांवर नियम लादण्याचा अधिकार नाही'; ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष काय म्हणाले?
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी 'इन डिफेन्स ऑफ डेमोक्रसी' परिषदेत बोलताना जागतिक राजकारणावर आणि संयुक्त राष्ट्रांच्या (UN) भूमिकेवर भाष्य केले.
"जगातील कोणत्याही देशाच्या राष्ट्राध्यक्षाला, तो देश कितीही मोठा असला तरी, इतर देशांवर नियम लादण्याचा अधिकार नाही," असे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 5 स्थायी सदस्यांवर टीका करताना, "सुरक्षा परिषदेचे 5 सदस्य आता युद्धखोर बनले आहेत," असे विधान त्यांनी केले.
"जगात स्वतःला सम्राट समजणाऱ्यांची वाढती प्रवृत्ती चिंताजनक आहे. गरीब जनतेला लोकशाही व्यवस्थेत जगण्याची आणि स्वतःच्या मतावर नियंत्रण ठेवण्याची संधी मिळायला हवी", अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याशिवाय, भारत, अर्जेंटिना आणि कोलंबियासारख्या देशांच्या सहभागावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)