दिल्लीपासून चेन्नईपर्यंत
भारतातील शहरं होताय अधिक उष्ण
भारतातील शहरांमध्ये उष्णता वाढत आहे. परंतु, या शहरांमध्ये राहणाऱ्या सर्वांनाच उकाड्याचा त्रास सारखा किंवा समान जाणवत नाही.
अमेरिकेच्या यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) संस्थेकडील लँडसॅट उपग्रहांच्या चित्रांच्या (प्रतिमा) अभ्यासातून, एकाच शहरातील वेगवेगळ्या भागांमधील उष्णतेत मोठा फरक दिसून आला.
लँडसॅट हा नासा आणि यूएसजीएसचा संयुक्त उपक्रम असून, तो पृथ्वीच्या जमिनीचे उपग्रह फोटो उपलब्ध करून देतो.
चित्रांमध्ये दिसून आले की, जास्त किंवा दाट इमारती आणि काँक्रीट असलेले भाग हे उद्यानं, झाडं किंवा पाण्याजवळच्या भागांपेक्षा खूप जास्त गरम होते.
हे महत्त्वाचं आहे, कारण जागतिक बँक आणि केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाच्या अहवालानुसार, भारतातील शहरांमध्ये राहणाऱ्यांची संख्या 2020 मधील 48 कोटींवरून 2050 पर्यंत जवळपास 95 कोटींवर जाणार आहे.
तसंच, अनेकांना थंडावा मिळवणंही कठीण आहे. शहरांतील फक्त 12.6 टक्के घरांमध्ये एसी आहे, तर 22 टक्के घरांमध्ये एअर कूलर आहेत.
शहरांचं तापमान कशामुळे वाढतंय?
दिल्ली

मुंबई

अहमदाबाद

चेन्नई

हैदराबाद

गेल्या दोन दशकांत भारतातील शहरांचा वेगाने विस्तार झाला आहे. यामुळे इमारती आणि बांधकामांचे क्षेत्रं वाढली आहे, तर अनेक ठिकाणी झाडे-झुडपे, शेती आणि मोकळ्या जागा कमी झाल्या आहेत.
रस्ते, इमारती आणि इतर बांधकामं ही जंगलं, शेती किंवा पाण्याच्या जागांपेक्षा जास्त उष्णता शोषून घेतात आणि परत सोडतात. म्हणूनच शहरं त्यांच्या आजूबाजूच्या भागांपेक्षा जास्त गरम होतात. यालाच अर्बन हीट आयलंड इफेक्ट म्हणतात.
2024 मधील नेचर सिटीज या अभ्यासानुसार, 2003 ते 2020 दरम्यान भारतातील शहरं देशातील इतर भागांच्या तुलनेत जवळपास दुप्पट वेगाने गरम झाली. त्यात शहरीकरणाचा वाटा सुमारे 38 टक्के आहे.
गेल्या दोन दशकांत शहराचा विस्तार कसा झाला

या नकाशांमध्ये 2000 ते 2020 या काळात {{city-name}} बांधकाम झालेल्या भागांचा विस्तार दाखवला आहे. बांधकाम असलेले भाग म्हणजे घरे, दुकानं, कारखाने आणि रस्ते यांसारखी मानवनिर्मित ठिकाणं.

एसीचा स्फोट का होतो आणि या दुर्घटना कशा टाळायच्या?
उन्हामुळे लोकांना काय होतोय त्रास, सूर्यास्तानंतरही कसा जाणवतो उन्हाचा परिणाम?
पुण्यात तयार होतायेत 'हीट आयलंड'; यामागची कारणं काय आणि हे किती धोकादायक?