अमोल मुझुमदार एक्सक्लुझिव्ह : 'ICC महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोणत्याही टीमला कमी लेखून चालणार नाही'

व्हीडिओ कॅप्शन, अमोल मुझुमदार एक्सक्लुझिव्ह : 'ICC T20 वर्ल्ड कपमध्ये कोणत्याही टीमला कमी लेखून चालणार नाही'
अमोल मुझुमदार एक्सक्लुझिव्ह : 'ICC महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोणत्याही टीमला कमी लेखून चालणार नाही'
Published

12 जूनपासून ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होतेय. त्यासाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झालेला आहे.

वर्ल्डकपसाठीची टीमची तयारी, वन-डे वर्ल्डकप जिंकल्यानंतरच्या 6 महिन्यांतले अनुभव, महिला क्रिकेटमध्ये झालेले बदल या सगळ्याबद्दल टीमचे मुख्य कोच अमोल मुझुमदार यांना काय वाटतं?

नोव्हेंबर 2025 मध्ये टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता टी 20 वर्ल्डकपमध्ये त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या वर्ल्डकपमध्ये भारत ग्रुप A मध्ये आहे आणि ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेसारखे बलाढ्य संघही याच ग्रुपमध्ये आहेत.

या दोन्ही देशांचा दौरा टीमने गेल्या काही महिन्यांत केला. मग टीमसमोर वर्ल्डकपमध्ये सर्वात मोठं आव्हान कुणाचं असेल?

वर्ल्डकपला जाण्याआधी बंगळुरुच्या BCCI च्या सेंटर ऑफ एक्सिलन्समध्ये टीमच्या सराव शिबिरादरम्यान अमोल मुझुमदार यांच्याशी मारलेल्या या गप्पा.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)