ब्लू ओरिजिन कंपनीच्या रॉकेटचा लाँचपॅडवरच स्फोट झाला तो क्षण...

व्हीडिओ कॅप्शन, ब्लू ओरिजिन कंपनीच्या रॉकेटचा लाँचपॅडवरच स्फोट झाला तो क्षण...
ब्लू ओरिजिन कंपनीच्या रॉकेटचा लाँचपॅडवरच स्फोट झाला तो क्षण...
Published

ब्लू ओरिजिन कंपनीच्या रॉकेटचा लाँचपॅडवरच भीषण स्फोट झाला.

अमेरिकेच्या फ्लोरिडातील केप कॅनॅवेरल इथल्या प्रक्षेपण केंद्रावर स्थानिक वेळेनुसर गुरुवारी २८ मेच्या रात्री ही घटना घडली.

अ‍ॅमेझॉनचे अब्जाधीश मालक जेफ बेझोस यांच्या 'ब्लू ओरिजिन'च्या या अंतराळ तंत्रज्ञान कंपनीचा New Glenn हा रॉकेट होता.

ब्लू ओरिजिन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.

"सर्व कर्मचारी सुरक्षित आणि संपर्कात आहेत. जशी अधिक माहिती मिळेल, तसे अपडेट्स दिले जातील," असे ब्लू ओरिजिनने एका निवेदनात म्हटले आहे.

हा स्फोट एका Hotfire test दरम्यान झाला असून, कंपनीने या घटनेचे वर्णन एक 'अनपेक्षित तांत्रिक त्रुटी' (Anomaly) म्हणून केलं आहे.

दरम्यान, नासानेही या घटनेच्या चौकशीसाठी आवश्यक ती मदत करू, असं म्हटलंय. तर ब्लू ओरिजिनची स्पर्धक कंपनी स्पेसएक्स या कंपनीचे मालक इलॉन मस्क यांनी या घटनेविषयी दुःख व्यक्त केलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)