अमेरिकेचा इराणवर हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया; आयआरजीसीने दिला 'हा' इशारा

गुरुवारी (25 जून) एका कार्गो शिपवर (मालवाहू जहाज) ड्रोन हल्ला झाला होता (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images/CENTCOM

फोटो कॅप्शन, गुरुवारी (25 जून) एका कार्गो शिपवर (मालवाहू जहाज) ड्रोन हल्ला झाला होता (फाइल फोटो)
    • Author, बर्न्ड डिब्शमन ज्युनियर
    • Role, व्हाइट हाऊस रिपोर्टर
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

अमेरिकेने शुक्रवारी (26 जून) इराणमधील काही ठिकाणांवर हल्ला केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर शस्त्रसंधीचे 'उल्लंघन' केल्याचा आरोप केल्यानंतर हा हल्ला झाला.

होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये एका कार्गो शिपवर (मालवाहू जहाज) हल्ला झाल्याच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी हा आरोप केला होता.

खरं तर, गुरुवारी (25 जून) जहाजावर एका ड्रोनने हल्ला केला होता. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यानंतर, हजारो अडकलेल्या खलाशांना बाहेर काढण्यासाठी योजना आखण्यात आली.

यानंतर शुक्रवारी अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) इराणच्या क्षेपणास्त्र-ड्रोन तळांवर आणि किनारपट्टीवरील रडार ठिकाणांवर हल्ला केल्याचे सांगितले.

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) या हल्ल्यासाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले आहे.

हल्ल्याची घोषणा करण्याच्या अगदी आधी अमेरिका इराणवर प्रत्युत्तर देईल का, असे ट्रम्प यांना विचारले असता, त्यांनी "तुम्ही बघालच," असे उत्तर दिले होते.

डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Ken Cedeno / AFP via Getty Images

इराण असा का वागेल, असा प्रश्न ट्रम्प यांना विचारला असता त्यांनी, "ते थोडे वेगळे आहेत," एवढीच प्रतिक्रिया दिली.

यानंतर शुक्रवारीच (26 जून) अमेरिकेच्या सेंट्रल कमांडटने (सेंटकॉम) इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन तळांवर तसेच किनारपट्टीवरील रडार तळांवर हवाई हल्ला केल्याची माहिती दिली.

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) या हल्ल्यासाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले आहे.

आयआरजीसीचा अमेरिकेला इशारा

शुक्रवारी झालेल्या हल्ल्यानंतर इराणच्या आयआरजीसीने अमेरिका आणि इस्रायलवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

आयआरजीसीने आपल्या निवेदनात म्हटलं, "अमेरिकेचे सरकार नेहमीप्रमाणे यावेळेसही आपल्या वचनांपासून मागे हटले असून विविध कारणं पुढे करत त्यांनी इराणच्या किनारपट्टीवर हवाई हल्ले केले आहेत."

"जर पुन्हा असा हल्ला झाला, तर आमची प्रतिक्रिया यापेक्षाही अधिक आक्रमक आणि मोठी असेल", असा इशारा आयआरजीसीने अमेरिकेला दिला.

आयआरजीसीने इस्रायलवर लेबनॉनमधील शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोपही केला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)