वादळ, पावसामुळे निर्माणाधीन पूल कोसळला; 6 मजुरांचा मृत्यू
वादळ, पावसामुळे निर्माणाधीन पूल कोसळला; 6 मजुरांचा मृत्यू
Published
वादळी वारे आणि पावसामुळे एक निर्माणाधीन पुलाचा काही भाग कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमध्ये घडली.
बेटवा नदीवरच्या या पुलाचं बांधकाम सुरू होतं. तेव्हा गुरुवारी 28 मे रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास इथे काही मजूर पावसातही काम करत होते.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार वादळ आलं तेव्हा आधी पुलाचा काही भाग कोसळला आणि नंतर पुलाला आधार देणारे खांबही कोसळले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तातडीने घटनास्थळी पोहोचलो. ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले होते. राज्य आपत्ती निवारण पथकालाही बोलावण्यात आलं असून मदत कार्य सुरू करण्यात आल्याची माहिती हमीरपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अरविंद कुमार वर्मा यांनी दिली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






